शिरपूर खूनाने हादरले : भर दिवसा तरुणाची निर्घृण हत्या
Shirpur shocked by murder : Brutal killing of youth in broad daylight शिरपूर :शहरातील शिंगावे शिवारातील बालाजी नगरातील रहिवासी असलेल्या राहुल राजू भोई (22) या युवकाचा अज्ञातांनी धारदार हत्यारांचे वार करीत खून केला. ही घटना शनिवार, 4 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. खुनाच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
खुनाचे कारण अस्पष्ट
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल भोई या तरुणावर अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने वार केल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत क्रांती नगर भागातील भद्रा चौक येथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. रुग्णालयात मयत राहुल याच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.


