पुन्हा माथेफिरुचा उपद्रव : अट्रावलच्या शेतकर्याच्या शेतातील केळी घड कापून फेकले ; सहा लाखांचे नुकसान
Renewed Menace by a Deranged Individual: Banana Bunches Cut and Discarded in Atrawal Farmer’s Field; Loss Estimated at Six Lakhs यावल (12 मे 2026) : यावल तालुक्यातील अट्रावल गावातील शेतकर्याचे यावल शेत-शिवारातील केळीच्या शेतात जावुन अज्ञात माथेफिरूने केळीचे तब्बल एक हजार 700 झाडे कापून फेकली. या प्रकारामुळे शेतकर्याचे तब्बल सहा लाखांचे नुकसान झाले. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गतवर्षी देखील अट्रावल आणि यावल शेत शिवारात अशाच पद्धतीने वेगवेगळ्या शेतकर्यांचे केळीचे झाड कापून मोठे नुकसान करण्यात आले. पुन्हा हा प्रकार घडल्याने शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
माथेफिरु पुन्हा झाले सक्रिय
अट्रावल, ता.यावल गावातील किरण नीळकंठ महाजन या शेतकर्याचे यावल शेत शिवारात शेत गट क्रमांक 594 आहे. या शेत गटातील 90 आर क्षेत्रामध्ये त्यांनी तीन हजार 200 केळीच्या खोडाची लागवड केली व केळी कापणी योग्य झाली होती. दरम्यान कापणी योग्य केळीला पाहणीसाठी सोमवारी शेतकरी किरण महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन हे शेतात काम करणारा विकास नाले याला सोबत घेऊन शेतात गेले असता त्यांना केळीच्या शेतातील केळीचे घड कापून जमिनीवर पडलेले दिसले. त्यांनी याची माहिती मोठे बंधू किरण यांना दिली ते शेतात आले व त्यांनी पाहणी केली असता तीन हजार 200 केळीच्या खोड पैकी 1 हजार 700केळीच्या झाडावरील घड कापलेले होते व छाटलेले होते. कुणीतरी अज्ञात माथेफिरूने नुकसान करण्याचे उद्देशातून शेतात अनधिकृतरित्या प्रवेश करून केळीचे घड कापून शेतकर्याचे तब्बल सहा लाख रुपयाचे नुकसान केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश सानप करीत आहे.


