एक कोटी 22 लाखांचे खंडणी प्रकरण : एसआयटी पथक चाळीसगावात


चाळीसगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल 1 कोटी 22 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावचे उदय पवार यांच्याविरुद्ध सूरज सुनील झंवर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा चाळीसगाव येथे घडल्यानंतर तो चाळीसगाव पोलीस ठाण्यात वर्ग झाा होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विशेष पथक गठीत एसआयटी गठीत केली असून पथकाचे अधिकारी रविवारी चाळीसगावात धडकले आहे. एका ट्रॅव्हल्स एजन्सीत अधिकार्‍यांकडून तपासणी सुरू असल्याची माहिती आहे.

पथकाकडून चाळीसगावात झाडाझडती
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाला सुरुवात केली आहे. पथकाकडून सुनील झंवर, सूरज झंवर, दीपक ठक्कर, तेजस मोरे, आयुष मणियार, विशाल पाटील यांचे जाबजबाब नोंदविले होते. तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी देखील केली आहे. संशयितांच्या शोधार्थ पथक वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात देखील जाऊन आले मात्र अद्याप कुणीही हाती आलेले नाही. गुन्ह्यात आणखी इतर कुणाचा सहभाग आहे का याचा देखील शोध घेणे पथकाकडून सुरू आहे.







ट्रॅव्हल्स एजन्सीतून कागदपत्रे पुण्यात गेल्याचा संशय
रविवारी सकाळी 7 वाजेपासून एसआयटीचे पथक चाळीसगावात ठाण मांडून बसले आहे. पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथील एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून काही दस्तऐवज पुणे येथे पाठविल्याची माहिती पथकाला मिळाली असून त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !