मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून आठ हजारांचे डिझेल चोरले : यावल तालुक्यातील प्रकार


Diesel worth 8000 stolen from mobile tower’s generator : Type in Yaval taluka यावल : तालुक्यातील चिंचोली येथील शेत शिवारात असलेल्या जिओ मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून चोरट्याने 150 लिटर डिझेल लांबवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
चिंचोली शेतशिवारात सकुबाई एकनाथ कोळी यांच्या शेत गट क्रमांक 2 मध्ये जिओ कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. या टॉवरला विद्युत पुरवठा देण्यासाठी जनरेटर असून त्यातील तब्बल आठ हजार रुपये किंमतीचे 150 लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने चोरी केले. जिओ कंपनीचे कर्मचारी योगेश गणेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !