आधी पोलिसांवर टिका केली अन् छापा पडताच कारवाई टाळण्यासाठी फोन करायचा हे बरोबर नाही : माजी मंत्री महाजनांची खडसेंवर सडकून टिका
All the brass of MLA Khadse were exposed; Girish Mahajan’s criticism! जळगाव : एकीकडे सभागृहात लक्षवेधी टाकून पोलिसांवर टिका करायची, मोठ-मोठ्याने भाषणे करायची आणि दुसरीकडे मतदारसंघात छापा टाकल्यानंतर ती माझी माणसे आहेत, त्यांना कसे उचलता असे म्हणून पुन्हा पोलिसांवर दबाव आणायचा, त्यांना धमकवायचे हे कुठले लोकप्रतिनिधी आहेत? असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टिका केली. मंत्री महाजन म्हणाले की, रेमंड व अवैध धंद्यांच्या बाबतीत खडसे यांचे सगळे पितळ उघडे पडले आहे. दुसरीकडे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जीभेला हाड नाही, ते बेछूट सुटलेले असल्याचेही महाजन म्हणाले.
खडसेंच्या आरोपांवर मंत्री महाजनांची टिका
आमदार अर्थसंकल्पीय खडसे यांनी अधिवेशनात जिल्ह्यातील अवैध धंद्यांपुढे पोलिस अधीक्षक हतबल झाले आहेत. अवैध धंद्यांचे खालपासून वरपर्यंत हप्ते जातात, असा आरोप केला होता. कुणाला किती हप्ते जातात, याची पुन्हा आकडेवारीही त्यांनी विधान परीषदेत सांगितली होती. त्याबाबत पत्रकारांनी मंत्री महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांना शनिवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणानंतर प्रश्न विचारला असता महामंनी यांनी खडसेंवर सडकून टिका केली. जिल्ह्यातील अवैध धंदे व रेमंड कामगारांच्या प्रश्नावर खडसे यांचे पितळ उघडे पडले असल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री खडसे आणि विद्यमान पुरस्कार मंत्री गिरीश महाजन यांच्यात जिल्ह्यातील अवैध धंद्यावरून कलगीतुरा रंगलेल्या कलगीतुर्याने जिल्हावासीयांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

खडसे यांनी पोलिस ठाण्यात फोन केला = मंत्री महाजनांचा दावा
खडसे यांचे भाषण ऐकून पोलिस प्रशासनाने परवा मुक्ताईनगरमध्ये कारवाई केली. तेथे अवैध दारू विक्री करणार्यांना पोलिसांनी पकडून आणले. त्यानंतर त्वरीत खडसे यांनी पोलिस ठाण्यात फोन केला. माझ्या माणसांना का पकडले ? मला वाटते हे फारच गंभीर आहे. हे खोटं असेल तर त्यांना जाऊन विचारा. त्यांनी पोलिस प्रशासनाला फोन केले नाहीत का? माझ्या माणसांवर छापा कसा टाकला, असे विचारले नाही का? असे मंत्री महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जळगावात सांगितले.
संजय राऊंत यांच्या जीभेला हाड नाही !
संजय राऊंत (Sanjay Raut) यांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही. ते बेछूट सुटलेले आहेत. रोज सकाळी उठून कोणाला शिव्या घालतील, कोणाला काय बोलतील याचा नेम नाही अशा शब्दात वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली. कसब्याची एक जागा जिंकली म्हणजे तीर मारला असे समजण्याचे कारण नाही. आता जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकांच्या निवडणूका आहेत तेथे काय दिवे लावतात ते शिवसेनेने दाखवावे, असे आव्हानही महाजन यांनी राऊतांसह महाविकास आघाडीला दिले आहे.
