निधी उपलब्धतेनंतरही शेळगाव बॅरेजचे काम अपूर्ण का ? : आमदार खडसेंचा विधानसभेत सवाल


Is the work of Shelgaon barrage incomplete even after availability of funds? : MLA Khadse’s question in the assembly मुक्ताईनगर : शेळगाव बॅरेज प्रकल्पाला निधी उपलब्ध असून सुद्धा काम अपूर्णावस्थेत का ? याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत प्रश्न उपस्थित केला. तापी नदीवर बांधण्यात येत असलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाला निधी उपलब्ध असून सुद्धा काम अपूर्णावस्थेत असल्याबद्दल एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत प्रश्न मांडला. याबाबत शासनाने काय चौकशी केली? चौकशी केली असेल तर प्रकल्प अपूर्णावस्थेत असण्याची कारणे काय आहेत? निधी उपलब्ध असुन सुद्धा प्रकल्प अपूर्णावस्थेत ठेवणार्‍यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असे खडसे म्हणाले.

फडणवीस म्हणाले : हो काम अपूर्णच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, शेळगाव बॅरेज प्रकल्पाला निधी उपलब्ध असून काम अपूर्ण असल्याची बाब अंशतः खरी आहे. शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे व प्रकल्पात सध्य स्थितीत 6.018 दलघमि पाणीसाठा करण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील तीन पैकी दोन पुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरीत एका पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. धरण रेषेच्या खालील बाजूस असणार्‍या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे बांधकाम भौतीकदृष्ट्या पूर्ण झाले असून बुडीत क्षेत्रातील प्रगतीपथावरील पूल जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाचे काम जून 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे प्रकल्पाच्या अद्यावत किंमतीस व उर्वरीत कामांसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवाल तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !