फुलगावात अखेर दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप

युवा स्वाभिमान पार्टीच्या पाठपुराव्याला यश ः महेंद्र पाटील यांचा सत्कार


भुसावळ : दिव्यांगांच्या हक्कांसाठी युवा स्वाभिमान पार्टीने केलेल्या यशस्वी पाठपुराव्यानंतर तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीत दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे नुकतेच वाटप करण्या आले. युवा स्वाभिमान पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आल्यानंतर त्यांचा दिव्यांग बांधवांनी प्रसंगी सन्मान केला.

माहिती अधिकारातून माहिती झाली उघड
महेंद्र पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागितल्यानंतर भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचातीमध्ये दिव्यांगांसाठीचा अनुशेष शिल्लक असल्याची बाब निदर्शनास आली तर गेल्या चार वर्षांपासून जिल्हा अपंग निधीत जमा न करता तसाच शिल्लक ठेवण्यात येत होता व दिव्यांगांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही माहिती अधिकारातून बाब जनतेच्या लक्षात आणून देण्यात आली व पाटील यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व अपंगांना प्रत्येकी चार हजार रुपये मानधन देण्यात आले आहे.

दिव्यांग बांधवांना अखेर साहित्याचे वाटप
या दिव्यांग व्यक्तींना युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, प्रशासक गणेश ठाकूर व ग्रामसेवक जितेंद्र आप्पासाहेब यांच्या हस्ते वाकर, कुबड्या, काडी अशा 28 वस्तूंच्या साहित्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. दरम्यान, दोन वर्षाचा अनुशेष शिल्लक असून पुढील दोन वर्षाच्या शिल्लक अनुशेषासाठी पाठपुरावा करून दिव्यांगांचा प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे महेंद्र पाटील म्हणाले. याप्रसंगी गणेश पाटील, गोपाळ सुतार, स्वप्नील बाऊस्कर, संगीता चौधरी यांच्यासह दिव्यांग बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !