भुसावळनजीक गीतांजली व काशी एक्सप्रेसमधून पडल्याने विवाहितेसह तरुणीचा मृत्यू
Young woman with wife dies after falling from Gitanjali and Kashi Express near Bhusawal भुसावळ : गीतांजली व काशी या धावत्या ट्रेनमधून पडल्याने विवाहितेसह तरुणीचा गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
धावत्या ट्रेनमधून पडल्याने विवाहितेसह तरुणीचा मृत्यू
भुसावळ : भुसावळ-भादली दरम्यान अप गीतांजलीसह काशी एक्स्प्रेसमधून तोल जावून पडल्याने 25 वर्षीय विवाहितेसह 26 वर्षीय तरुणीचा गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. पहिल्या घटनेत पौर्णिमा दिनकर इंगळे (26, सुंदरखेड, ता.बुलढाणा) ही तरुणी गीतांजली एक्स्प्रेसमधून मलकापूर ते जळगाव दरम्यान प्रवास करीत असताना भादली-वाघूरदरम्यान तोल जावून पडल्याने मयत झाली. मालगाडीद्वारे तिचा मृतदेह भुसावळ स्थानकावर आणल्यानंतर निरीक्षक विजय घेर्डे यांनी ट्रामा सेंटरमध्ये तो शवविच्छेदनासाठी हलवला. तरुणीच्या पर्समधील आधार कार्डासह मोबाईलद्वारे तिची ओळख पटली.

विवाहितेचा तोल जावून पडल्याने मृत्यू
दुसर्या घटनेत विवाहिता रचनी चासलाल पारधी (25 रा.पन्ना, मध्यप्रदेश) ही डाऊन काशी एक्स्प्रेसने कल्याणहून पन्नाकडे आई-वडिल व भावासह प्रवास करीत होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ती जनरल कोचमधील वॉश रूममध्ये गेल्यानंतर बाहेर येताच तिचा तोल गेल्याने ती रूळावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. रचनी पारधी ही विवाहिता कल्याणस्थित आपल्या पतीला भेटण्यासासाठी कुटुंबा कल्याणला गेल्यानंतर परतीच्या प्रवासात ही घटना घडली. भुसावळ स्थानकापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.