डोंगरकठोर्‍यातील प्रौढाचा शेतविहिरीत पडल्याने मृत्यू


An adult in Dongarkathora died after falling into a farm well यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा गावातील 50 इसमाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. मयत इसम विहिरीजवळून जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत कोसळला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने विहिरीतून बाहेर काढण्यात मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तोल जावून पडल्याने मृत्यू
डोंगरकठोरा गावातील रेवानंद मुरलीधर भारंबे (50) हे आपल्या शेतातील विहिरीजवळून जात असताना अचानक त्यांचा पाय घसरला व ते विहिरीत पडले हा प्रकार नागरीकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली व भारंबे यांना तातडीने विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिसात भगवान भालचंद्र भारंबे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !