चिंचोलीत दुचाकी लावण्याच्या कारणावरून एकास पाच जणांची मारहाण
One of five people was beaten up for parking a two-wheeler in Chincholi यावल : तालुक्यातील चिंचोली गावात पान टपरीजवळ मोटरसायकलच्या शेजारी मोटरसायकल का लावली या कारणावरून एका तरुणाला पाच जणांनी जबर मारहाण केली. तरुणाच्या तोंडावर, डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली असून याप्रकरणी यावल पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ कारणावरून केली मारहाण
चिंचोली या गावात समाधान पान टपरीजवळ नूर मोहम्मद कादर तडवी (किनगाव) यांनी मोटरसायकल लावली होती. या ठिकाणी राकेश श्रावण पाटील, सुभाष श्रावण पाटील, पंकज अशोक धनगर, रुपेश राजू धनगर व सागर लहू पाटील (किनगाव) या पाच जणांनी येऊन तडवी याला येथे मोटारसायकल का लावली ? अशी विचारणा करीत त्याला जबर मारहाण केली. तरुणाच्या तोंडावर, डाव्या डोळ्याजवळ, ओठावर जवळ दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर या प्रकरणी लुकमान तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजित शेख करीत आहे.
