रावेरात ट्रक चालकाला मारहाण करीत लूटले : चौघांविरोधात गुन्हा
Truck driver beaten and robbed in Raver : Crime against four रावेर : रावेर शहरातील बर्हाणपूर रोडवरील गोपी तोल काट्याजवळ एका ट्रक चालकाला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातून दोन हजार रुपयांची रोकड हिसकावण्यात आली. रावेर पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन हजारांची केली लूट
ट्रक चालक मोहम्मद मोहसीन मोहम्मद आमद (30, फैजपूर) हे गुरुवार, 30 मार्च रोजी सकाळी सायंकाळी 6.30 वाजता रावेर शहरातील बर्हाणपूर रोडवरील गोपी तोल काट्याजवळ ट्रक घेवून आले असता संशयित रावेर शहरातील शेख रशीद शेख मेहमूद व त्याचा मुलगा, शेख बाशीद शेख रशीद (दोघे रा.रावेर), सद्दाम मणियार आणि त्याच्यासोबत असलेला एक जण अशा चौघांनी ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड हिसकावत ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. या संदर्भात मोहम्मद मोहसीन मोहम्मद आमद यांनी रावेर पोलिसात तक्रार दिल्यावरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.
