मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवासी झोपताच एक लाखांचा महागडा मोबाईल लंपास
Expensive Mobile Lumpas of Rs.1 Lakhs as soon as passengers sleep in Mangala Express भुसावळ : निजामुद्दीन-कन्नुर असा प्रवास करीत असलेल्या प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपये किंमतीचा आयफोन लांबवला ही 12 फेब्रुवारी रोजी मंगला एक्स्प्रेसमध्ये घडली. याप्रकरणी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा
केरळ राज्यातील कन्नुर येथील रहिवासी असलेले रसीद मोहंमद अली रूकीयास हे 12618 मंगला एक्स्प्रेसच्या ए-2 या डब्यातील 31 नंबरवरील सीटवरून 12 फेब्रुवारीला प्रवास करीत असताना त्यांना झोप लागली व त्याचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लांबविला. ही घटना कल्याण स्थानक येण्यापूर्वी घडली. याप्रकरणी मेलद्वारे आलेल्या फिर्यादीवरून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा लोहमार्ग पोलिसांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला.
