पोलिसांच्या सुरक्षा ऑडीटमध्ये ‘जंक्शन सपशेल नापास’

चोरटे मार्ग बंद करण्यासह तातडीने लगेच स्कॅनर मशीन सुरू करा : प्रभारी डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या सूचना :


‘Junctions completely fail’ in police security audit भुसावळ : रेल्वे स्थानकात शिरण्यासाठी येणारे चोरटे मार्ग तातडीने बंद करून संशयित प्रवाशांची कसून तपासणी होण्यासाठी यंत्रणेने अलर्ट रहावे तसेच बंद पडलेले स्कॅनर मशीन सुरू करावे, अशा सूचना प्रभारी डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांनी दिल्या. शुक्रवारी तीन तास रेल्वे स्थानकाचे सुरक्षा ऑडीट केले. यावेळी त्यांच्या समवेत आरपीएफ, आय.बी., एसआयडीचे अधिकारी असा लवाजमा होता.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपस्टेशन मास्तर सुधीर देशपांडे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, सहायक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, लोहमार्ग पोलिस अधिकारी, कर्मचारी, नंदू सोनवणे यांच्यासह गोपनीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सुरक्षेच्या दृष्टीने ऑडीट
दरवर्षी पोलिस प्रशासनाकडून रेल्वे स्थानकाचे सुरक्षा ऑडीट केले जाते. शुक्रवारी पोलिस अधिकार्‍यांनी विविध प्लॅटफॉर्मची पहाणी करून पार्सल विभाग, आऊटरची पाहणी करीत साने गुरूजी स्मारकाजवळ आणि कॉसमॉस बॅकेच्या समोर रेल्वे हद्दीत संरक्षण भिंत उभारण्याच्या सूचना केल्या. डीवायएसपी डॉ. सोनवणे आणि अधिकारी वर्गाने सकाळी 9 ते 12.30 या वेळात स्थानकाची पाहणी केली. यात त्यांनी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या 128 सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची तसेच कंट्रोल रूमची पाहणी केली


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !