नोकरी न लावल्याचा राग अनावर : जळगावातील मविप्र संस्थेच्या संचालकांच्या घरासह वाहनांची तोडफोड


Anger over not getting a job: Vandalism of vehicles along with the house of the director of the MVIPR organization in Jalgaon जळगाव : शहरातील कोल्हे नगरातील मुख्याध्यापक तथा मविप्र संस्थेत कर्मचारी प्रतिनिधी म्हणून संचालक असलेल्या महेंद्र वसंतराव भोइेटे यांच्या घराच्या खिडक्यांसह कार, दुचाकीची दोन संशयितांनी नोकरी न लावल्याच्या रागातून तोडफोड केली. ही गुरूवारी मध्यरात्री घडली. भोईटे यांच्या हनुमान नगरातील मित्राच्या घरावर सुध्दा संशयीतांनी दगडफेक करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नोकरी न लावल्याचा राग अनावर
कोल्हे नगर येथे महेंद्र भोईटे हे पत्नी व मुलीसह वास्तव्यास आहेत. ते ऑर्डनन्स फॅक्टरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून नोकरीला आहेत तर जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेत कर्मचारी प्रतिनिधी म्हणून संचालक आहेत. संशयित कल्पेश भोईटे हा त्यांना संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगत होता मात्र त्यास त्यांनी संस्थेत नोकरी लावणे माझ्या हातात नाही, असे सांगून नकार दिल्यामुळे त्याचा त्याला राग आल्याने गुरुवार, 30 मार्चच्या मध्यरात्री 12.45 वाजेच्या सुमारास कल्पेश व त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्तीने भोईटे यांच्या घराच्या कुंपणावरील झाडांच्या कुंड्या उचलून त्या दरवाजा आणि कारच्या काचेवर आणि बोनटवर फोडल्या. बाजूला उभी मोपेड दुचाकीचे सुध्दा नुकसान केले. त्यानंतर घराच्या खिडक्या, नेमप्लेट, गेट लॉकदेखील तोडले. त्यानंतर शिवीगाळ करून भोईटे यांना तुला डंपर खाली चिरडून टाकेल, अशी धमकी दिली. या तोडफोडीत भोईटे यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !