जळगावात सहा लाखांचा किराणा लांबवणार्‍या नोकराला बेड्या

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : 30 हजार रुपये हस्तगत


Handcuffs to the servant who delivered groceries worth six lakhs in Jalgaon जळगाव :  किराणा दुकानात काम करणार्‍या कामगार तरुणाने दुकानातील तब्बल पाच लाख 69 हजार 530 रुपयांचा किराणा लांबवल्याची घटना शहरातील रामेश्वर कॉलनीत घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दुकानातील नोकर विशाल शरद पाटील (मेहरुण) यास एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली.

पुण्यातून आवळल्या मुसक्या
संशयित विशाल हा पुण्यात असल्याचे गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, सुधीर सावळे, इम्रान सय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने संशयित विशाल यास पुण्यातून अटक करत शनिवारी जळगाव आणले. संशयित विशाल याच्याकडून चोरीचा किराणा विक्री केल्यानंतर मिळालेले 30 हजार जप्त करण्यात आले. संशयीताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !