वायला गावात सरपंचांच्या सतर्कतेनंतर पावणेदोन लाखांचे सागवान लाकूड जप्त
वायला गावात वढोदा वनविभागाच्या कारवाईने तस्करांमध्ये खळबळ
Teak wood worth two lakhs seized after vigilance by sarpanch in Vayla village कुर्हाकाकोडा : जवळच असलेल्या वायला येथे सरपंचांनी केलेल्या तक्रारीनंतर वनविभागाने छापेमारी करीत एक लाख 80 हजारांचे सागवान लाकूड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवार, 1 एप्रिल रोजी वायला सरपंच आरती राहुल इंगळे यांनी वढोदा वनविभागाकडे सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची तक्रार केली होती. सरपंच आरती राहुल इंगळे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अधक्ष्य सोपान लालाचंद पाटील यांनी पाहणी केल्यानंतर वायला गावठाणच्या उत्तर दिशेला नालीत अंदाजे तीन घनमीटरचे 250 नग सागवान लाकूड व तीन रंधा मशीन आढळल्याने एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, हे लाकूड कुणी आणले याचा शोध घेण्याची अपेक्षा व्यक्त होत असून सरपंचांना माहिती मिळते मात्र वनविभाग गाफिल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई वनविभागचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक मृद कॅम्प यु.एम.बिराजदार यांच्या मार्गदर्षणाखाली वढोदा वनपरीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, वनपाल जी.डी.गवळी, वनसरक्षक डी.एस.पवार, आर.एल.आसुरे, रमेश जगदेव कांडेलकर, कायम वन मजूर व वन कर्मचार्यांनी केली.
