वीज तारांच्या घर्षणानंतर शेतात आग : भादलीत साडेचार लाखांच्या चार्‍यासह ज्वारी खाक


Short circuit in the field: Farmer’s fodder loss worth four and a half lakhs in Bhadli जळगाव : शेतात वीज तारांमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्यानंतर लागलेल्या आगीत साडेचार लाखांचा गुरांचा चारा व ज्वारी खाक झाली. ही घटना शनिवार. 1 रोजी दुपारी तीन वाजता भादली स्टेशनमागील गट क्रमांक 708/2 मधील शेतात घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

महिला शेतकर्‍याची नशिराबाद पोलिसात तक्रार
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील महिला शेतकरी प्रीती विलास महाजन यांचे जळगाव तालुक्यातील भादली रेल्वेस्टेशन जवळ शेत गट नंबर 708/2 मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी गुरांना लागणारा चारा व ज्वारीच्या पेंढ्या रचून ठेवल्या होत्या. शनिवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या शेतावरून गेलेल्या महावितरण कंपनीच्या वीत जारांमध्ये घर्षण होवून शॉर्ट सर्किट झाले व शेतातील चार्‍याला आग लागली. या आगीत दोन लाख रुपये किंमतीच्या चार्‍याच्या पेंढ्या तसेच अडीच लाख रुपये किंमतीची ज्वारी जळाली. शेतकरी प्रीती विलास महाजन यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिल्यावरून रविवारी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सरला देवर करीत आहे. दरम्यान, महिला शेतकर्‍याने वीज कंपनीकडे भरपाई देणयची मागणी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !