जळगावात लग्न मोडल्याच्या वादातून तरुणावर चॉपर हल्ला : एकाविरोधात गुन्हा


Chopper attack on young man over marriage break-up in Jalgaon : Crime against one जळगाव : प्रेमसंबंध असलेल्या मुलीसोबत जमलेले लग्न मोडल्याच्या रागातून एकाने तरुणावर चॉपर हल्ला केल्याची घटना जळगाव शहरातील शिवाजीनगर पुलानजीक रविवार, 2 रोजी रात्री 10 वाजता घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्न मोडल्याच्या वादातून चॉपरने हल्ला
दीपक लक्ष्मण गवळी (34, गवळीवाडा, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, संशयित विवेक किशोर मराठे (जळगाव) याचा नातेवाईक गोलू मराठे याचे प्रेमसंबंध असलेल्या तरुणीशी लग्न जुळल्यानंतर ते विक्की सांडू यादव (बळीरामपेठ, जळगाव, मूळ रा.शिवनगर, संभाजीनगर) याच्यामुळे तुटले व या रागातून शिवाजी नगर पुलाजवळ बीजीआर होजिअरीजवळ संशयित विवेक किशोर मराठे (जळगाव) याने चॉपरने विक्की यादव यास भोसकून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. चॉपर हल्ल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !