चमगावात सासरा व जावयात ‘दे दणादण’ : परस्पर विरोधी गुन्हे


Father-in-law and son-in-law ‘De Danadan’ in Chamgaon: mutual crimes धरणगाव : जुना वाद उफाळून आल्यानंतर सासरा व जावयात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे सोमवारी सकाळी 11.30 वाजता घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

परस्परविरोधात गुन्हे दाखल
पहिली फिर्याद सुरेश गंभीर पाटील (रा.पाळधी) यांनी दिली. त्याचा आशय असा की, की, ते पत्नीसह सोमवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मुलीची तब्येत खराब असल्यामुळे चमगाव येथे मुलीच्या घरी गेले होते. यावेळी जावई ज्ञानेश्वर प्रकाश पाटील याने त्याचा हातातील चाबी अटकवलेली चैन तोंडावर मारुन पुढील दात पडून ओठ फाडून दुखापत केली तसेच त्याचे वडील प्रकाश पंढरीनाथ पाटील व त्याची पत्नी यांनी आम्हाला शिवीगाळ करुन चापटांनी मारहाण केली. यानंतर मुलीलादेखील तिचा पती ज्ञानेश्वर पाटील याने पोटावर चापट्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तपास हवालदार खुशाल पाटील करीत आहेत.

जावयाच्या तक्रारीवरून सासर्‍याविरोधात गुन्हा
दुसरी फिर्याद ज्ञानेश्वर प्रकाश पाटील (रा.चमगाव) यांनी दिली. त्यानुसार कौटुंबिक भांडणाच्या कारणावरुन सोमवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सासरे सुरेश गंभीर पाटील व इतरांनी त्यांच्यासह आई-वडीलांना शिविगाळ करीत चापटाबुक्कयांनी मारहाण केली. तपास नाईक दीपक पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !