चोपड्यात खळबळ : पीपल्स बँकेचे एटीएम फोडले : सुदैवाने रोकड सुरक्षित


Excitement in Chopda: People’s Bank ATM broken into: Fortunately, cash is safe चोपडा : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील दि जळगाव पीपल्स को. ऑप.बँकेचे एटीएम फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने एटीएममधील रोकड सुरक्षित राहिल्याने बँकेचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीवरून आरोपीचा शोध
सोमवार, 3 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील दि जळगाव पीपल्स को. ऑप. बँकच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करीत एटीएम मशीन कशाने फोडत त्यातून पैसे लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने रोकड न निघाल्याने नुकसान टळले तर एटीएम मशीनचे मात्र नुकसान झाले. या प्रकरणी बँकेचे कर्मचारी सुनील सुभाष महाजन (दत्त मंदिरामागे, शिरूड नाका, अमळनेर, जि.जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलिस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !