जळगावातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचे बनावट अश्लील पाठवून बदनामी
Fake obscene photos of student sent to hostel in-charge ; Crime in Jalgaon Cyber Police! जळगाव : शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्या 22 वर्षीय तरुणीचे बनावट अश्लील फोटो बनवून हॉस्टेल इन्चार्जला पाठवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार शहरात उघडकीस आला आहे संशयीताने तरुणीला तातडीने होस्टेलमधून काढून टाका, अन्यथा फोटो व्हायरल करण्यात येतील, अशी धमकीदेखील दिल्याने तरुणाने संबंधित मोबाईल नंबर धारकाविरुद्ध जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखलकेला आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा
22 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार, ती जळगावातील अभियांत्रिकी महाविद्यालयता शिक्षण घेण्यासाठी आली असून हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहेत. +1239-6766240 या क्रमांकावरील संशयित आरोपीने पीडीतेचा चेहरा असलेले अश्लील फोटो तयार करून हॉस्टेल इन्चार्जला 22 रोजी मार्च पाठवले तसेच या विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.
