जळगावात कपडे विक्रेत्या महिलेचा विनयभंग : रीक्षा चालकाविरोधात गुन्हा
Jalgaon clothes seller woman molested : Crime against rickshaw driver Jalgaon clothes seller woman molested : Crime against rickshaw driver जळगाव : फुले मार्केट परीसरातील एका भागात कपडे विक्री करणार्या 34 वर्षीय महिलेशी अंगलट करीत तिला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार्या रीक्षा चालकाविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रीक्षा चालकाविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील एका भागात वास्तव्यास असलेली 34 वर्षीय विवाहिता फुले मार्केट परीसरातील एका भागात कपडे विक्रीचा व्यवसाय करते. रविवार,.2 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेच्या हातगाडीवर रीक्षा चालक आसीफ शहा दिलावर शहा (फातीमा नगर, 36 खोल्या, जळगाव) आला व त्याने विवाहितेशी जवळीक साधत तिचा विनयभंग केला तसेच मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून विनयभंग केला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहेत.
