अमळनेरात महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र धूम स्टाईल लांबविले
अमळनेर : शहरातील छत्रपती शिवाजी बगीचा जवळून पायी जात असलेल्या विवाहितेच्या गळ्यातील १६ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र दोन भामट्यांनी दुचाकीवर येऊन धूम स्टाईल लांबवले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात सोमवार, ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला वर्ग धास्तावल्या
हेमलता नामदेव शिंपी (45, मुंदडा नगर , अमळनेर) या महिला पती नामदेव दगडू शिंपी यांच्यासह वास्तव्याला आहे. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हेमलता शिंपी या महिला शहरातील छत्रपती शिवाजी बगीच्या जवळून पायी जात होत्या. त्याचवेळी अज्ञात दोन भामटे दुचाकीने मागून आले. विवाहितेच्या गळ्यातील १६ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र त्यांनी जबरी हिसकावून पळ काढला. या संदर्भात महिलेने अमळनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सोमवार, ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक कैलास पवार करीत आहे.
