हंबर्डी शिवारात 13 हजारांची केळी चोरली : आंदलवाडीच्या तरुणाविरोधात गुन्हा


Banana worth 13 thousand stolen in Hambardi Shiwar : Crime against youth of Andalwadi फैजपूर : Banana worth 13 thousand stolen in Hambardi Shiwar : Crime against youth of Andalwadi नफ्याने केलेल्या शेतातून केळी घड चोरताना शेतकर्‍याने तरुणाला पकडल्याची घटना हंबर्डी शिवारातील भिलाणी यांच्या शेतात रविवारी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी आंदलवाडी, ता.रावेर येथील तरुणाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताविरोधात गुन्हा दाखल
निखील मनोहर फिरके (28, भोगेवाडा, न्हावी) यांनी नफ्याने हंबर्डी शिवारात केळीची शेती केली असून संशयित अमरदीप संतोष तायडे (19, आंदलवाडी) हा रविवारी रात्री साडेआठ वाजता मालवाहू रीक्षा क्रमांक (एम.एच.12 ई.एफ.8112) मधून 13 हजार रुपये किंमतीची पाच क्विंटल केळी चोरताना आढळल्याने त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. तपास नाईक बाळू भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !