भडगाव तालुका हादरला : वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरने झोपेतील 11 वर्षीय बालिकेचा घेतला बळी


An 11-year-old girl was killed when a tractor carrying sand entered the house भडगाव : वाळू वाहतूक करणारे अनियंत्रीत ट्रॅक्टर आमडदे येथील काही घरांमध्ये शिरल्याने झोपेत असलेली 11 वर्षीय बालिका ठार झाली तर बालिकेच्या बहिणीसह शेजारील महिला जखमी झाल्या. हा अपघात बुधवार, 5 रोजी पहाटे घडला .वैशाली बालू सोनवणे (11) असे ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.

अनियंत्रीत ट्रॅक्टर शिरले घरात
भडगाव तालुक्यातील आमडदेनजीक वलवाडी रस्त्यावर गरीब वस्तीतील लोक सकाळी झोपेत असताना पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास वाळूचे ट्रॅक्टर तीन ते चार घरांमध्ये घुसले. त्यात वैशाली बालू सोनवणे (11) ही बालिका जागीच ठार झाली तर तिची बहिण पिंकी सोनवणे (5) आणि घराशेजारी राहणारी बानूबाई वाघ (44) या जखमी झाल्या. जखमींंना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !