मोलकरणीवर गुंगीचे औषध देवून जळगावात बलात्कार : तरुणाविरोधात गुन्हा


Rape of maid in Jalgaon by giving gungi drug : Crime against young man जळगाव : घरकाम करणार्‍या विवाहितेवर ओळखीच्या तरुणाने पीडीतेच्या घरीच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शहराजवळील उपनगरात घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात पाचोरा तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुधात गोळ्या टाकून अत्याचार
जळगाव शहरालगतच्या एका उपनगरातील 30 वर्षीय विवाहिता घरकाम करते व तिची पाचोरा तालुक्यातील जयदीप सुरेश पाटील (30) नावाच्या तरुणासोबत ओळख होती. संशयीताने 4 जानेवारी 2022 ते 3 एप्रिल 2023 दरम्यान वेळोवेळी पीडीतेच्या घरी जावून अत्याचार केला तसेच गरम दुधात गोळ्या टाकून ते दूध पीडीतेला पिण्यासाठी दिले व पिडीतेला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यासोबत झोपेतच शरीर संबंध प्रस्थापीत केले. ज्यावेळी हा प्रकार पीडीतेच्या लक्षात आला त्यावेळी तिने त्याला जाब विचारला. पण तू जर हा प्रकार तुझ्या पतीला सांगितला तर तुझा, तुझ्या मुलाचा आणि तुझ्या पतीचा मर्डर करेन, अशी त्याने पिडीतेला धमकी दिली. एवढेच नव्हे तर जयदीप हा पिडीतेसोबत वेळोवेळी लैंगिक अत्याचारसह मारठोकही करत राहिला. पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !