रावेर शहरात वीज चोरी : चौघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल
Electricity theft in Raver city : Case registered against four in Yaval police यावल : रावेर शहरातील महावितरण कंपनीकडून गोपाल नगर स्टेशन रोड भागात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी चार जणांना वीज चोरी करतांना पकडण्यात आले. त्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र, त्यांनी दंड न भरल्याने या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दंड न भरल्याने अखेर गुन्हा
रावेर विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणीसह भिका साळुंखे, अमोल हिवरे, वासुदेव चौधरी, कमलेश माळी या पथकाने शहरातील गोपाल नगर, स्टेशन रोड भागात विविध चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली यात मदिना कॉलनी व मिल्लत नगरमध्ये महेमुद खान हबीब खान हे वीज चोरी करतांना आढळून आले त्यांना 12 हजार 458 रूपये दंड आकारण्यात आला, याच भागात शेख रिजवान शेख रियाज हे देखील वीज चोरी करतांना आढळले त्यांना 6 हजार 940 रुपये दंड आकारण्यात आला. शेख रईस शेख सत्तार या मिटर धारकाच्या मिटरमध्ये नासिर नामदार तडवी यांनी फेरफार केलेले आढळले त्यांना 11 हजार 572 रुपये दंड करण्यात आला आणि मोहम्मद असलम शेख इस्माईल हे वीज चोरी करतांना आढळले त्यांना 12 हजार 128 रुपये इतका दंड आकारण्यात आला या चारही जणांना दंड अदा करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली. मात्र या चौघांनी दंड भरला नाही. त्यांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात या चौघाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
