25 वर्षीय विवाहितेचा विनयभंग : बांबरूड महादेवाचे गावातील चौघांविरोधात गुन्हा
molestation of a 25-year-old married woman : Bambarud Mahadev’s crime against four people in the village पाचोरा : पाचोरा तालुक्यातील बांबरूड महादेवाचे गावातील 25 वर्षीय विवाहिता रस्त्याने जात असताना तिची वाट अडवत चौघांनी विनयभंग करीत स्त्री मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. ही घटना 20 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात भीमसिंग हरीसिंग राजपूत, प्रदीप सुभाष बागुल, कमलाकर सुभाष बागुल, लकी भीमसिंग राजपूत (सर्व रा. महादेवाचे बामरुड ता. पाचोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्ता अडवून विनयभंग
25 महिलेच्या तक्रारीनुसार, ती पाचोरा-भडगाव रस्त्यावरून जात असताना संशयित चौघांनी तिची वाट अडवली. भीमसिंग राजपूत याने महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य केले तर संशयितांनी वेगवेगळे विचीत्र आवाज काढत घडल्या प्रकाराची कुणाला काही माहिती दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. तपास पोलिस नाईक अशोक हटकर करत आहेत.
