खेडगाव येथे तीन लाखांची घरफोडी : दोन लाख 86 हजारांचा ऐवज चोरीला


Burglary worth three lakhs in Khedgaon : Two lakh 86 thousand was stolen चाळीसगाव : तालुक्यातील खेडगाव येथे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत दोन लाख 86 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
शालिग्राम शंकर माळी (67, खेडगाव) हे खेडगाव येथे परीवारासह वास्तव्यास आहेत. बुधवार, 5 रोजी सकाळी 10 ते दुपारी चार दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत हॉलमधील लाकडी कपाटातून 50 हजारांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिणे मिळून दोन लाख 86 हजारांचा ऐवज लांबवला. सायंकाळी माळी कुटूंब आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर मेहुणबारे पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !