दारू पिल्यानंतर पैसे मागताच ग्राहक सैराट : जळगावात हॉटेल चालकासह वेटरला मारहाण
Hotel driver and waiter assaulted in Jalgaon : Crime against four जळगाव : मद्य प्राशन केल्यानंतर झिंगाट झालेल्या चौघांनी हॉटेल मालकासह वेटरला मारहाण केल्याची घटना जळगाव शहरातील प्रभात चौकात असलेल्या हॉटेल मोहनिशमध्ये रविवारी दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी रविवारी रात्री 11 वाजता रामानंदनगर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैसे मागताच सैराट झाले ग्राहक
हर्षल राजेंद्र बारी (28, ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव) यांचे प्रभात चौकात हॉटेल मोहनिश नावाचे हॉटेल आहे. रविवारी त्यांच्या हॉटेलवर पिंटू कोळी याच्यासोबत अनोळखी चौघै जण दारू प्यायला बसले. दारू पिल्यानंतर बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल चालक हर्षल राजेंद्र बारी व वेटर यांना चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली तसेच हॉटेलमधील बाटल्या, टेबल, खुर्च्या यांची नासधूस करीत दगड व विटा काउंटर फेकून नुकसान करण्यात आले. या संदर्भात हर्षल बारी यांनी रामानंदनगर पोलिसात संशयित आरोपी पिंटू कोळीसह इतर अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.
