अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती : नराधम आरोपीला 12 वर्ष शिक्षा


Underage girl pregnant due to torture : Murder accused gets 12 years sentence जळगाव : अल्पवयीन पीडीतेवर अत्याचार केल्याने त्यातून ती गर्भवती राहिली होती. या प्रकरणी आरोपी शरद सखाराम भील यास धरणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 12 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली.

चोपडा पोलिसात दाखल होता गुन्हा
पीडीता अल्पवयीन असतानाही शरद भील याने तिला पालकांच्या रखवालीतून पळवून नेले होते. याप्रकरणी सन 2020 मधे आरोपीविरुद्ध चोपडा शहर पोलिसात पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 21 जून 2020 रोजी आरोपीला अटक करण्यात आली. चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील जंगलात आणि मंजरेहोळ शिवारात त्याने पिडीत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला होता. त्यातून तिला गर्भधारणा झाली होती. आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

12 वर्ष शिक्षा
आरोपी शरद सखाराम भील (धरणगाव तालुका) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमळनेर यांनी एकत्रीत 12 वर्षांची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास सहा.निरीक्षक मनोज पवार यांनी केला. त्यांना हवालदार प्रदीप राजपूत यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.आर.बी. चौधरी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. केस वॉच पोलिस कर्मचारी नितीन कापडणे यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !