शांतारात, तु लय मातलाय म्हणत तलवारीने केला : मोठे वाघोदे गावात खळबळ
A sword attack on one at Big Waghoda सावदा : जवळच असलेल्या मोठा वाघोदा येथे थट्टा-मस्करी सुरू असताना झालेल्या वादानंतर वचक काढण्यासाठी आलेल्या एकाने तलवारीने हल्ला करीत एकाला गंभीर जखमी केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी दुपारी 12.30 वाजता घडली. या प्रकरणी संशयित इमाम मुबारक तडवी (वाघोदा बु.॥) याच्याविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ वादातून तलवार मारली
मोठा वाघोदा येथील युवराज उर्फ शांताराम सीताराम आढाळे (54) यांच्या तक्रारीनुसार, रविवार, 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता युवराज हे त्यांचा मुलगा ऋतीकसह चिनावल फाट्यावर डी.के.महाजन यांच्या घरामागील बाजूस गप्पा मारत असतांना दारूच्या नशेत संशयित इमाम मुबारक तडवी हा आला व त्याने महेंद्र चौधरी (बढे) यांची टिंगल केल्यानंतर वाद झाल्याने संशयित निघून गेला व काही वेळेनंतर इमाम हातात तलवार घेवून दोघांजवळ आला. थांब शांताराम तू लय मातला आहे, तुला आता पाहतोच, असे म्हणत आरोपीने युवराज यांच्यावर तलवारीने वार केले. यात कपाळावर आणि हातावर दुखापत केली. तर ऋतीक यालादेखील मारहाण केली. याप्रकरणी शांताराम आढाळे यांनी सावदा पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपी इमाम मुबारक तडवी (वाघोदा बु.॥) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अन्वर तडवी करीत आहेत.
