जळगावातील स्टेट बँक कॉलनीत बंद घर फोडत 85 हजारांचा ऐवज चोरीला


85 thousand was stolen by breaking into a locked house in State Bank Colony in Jalgaon जळगाव : शहरातील स्टेट बँक कॉलनीत घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह देवांच्या मुर्त्या, टीव्ही आणि मोबाईल असा एकूण 85 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
प्रदीप आबाजी सोरटे (57, स्टेट बँक कॉलनी, जळगाव) हे खाजगी नोकरदार असून कुटुंबासह ते बुधवार, 5 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील 30 हजार रुपये किंमतीचे कानातले, दहा हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे, दहा हजार रुपये किंमतीचे टायटन घड्याळ, एक हजार दोनशे रुपये किंमतीचे चांदीचे शिक्के, चार हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 15 हजार रुपये किंमतीचा टीव्ही व पाच हजारांचा मोबाईल असा एकूण 85 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. हा प्रकार सोमवार, 10 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आला. प्रदीप सोरटे यांनी मंगळवारी सायंकाळी तक्रार दिल्यानंतर रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुशील चौधरी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !