जळगाव शहर हद्दीत घरफोडी : मध्यप्रदेशातील आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
Burglary in Jalgaon city limits : Madhya Pradesh accused in LCB’s net जळगाव : जळगाव शहर हद्दीत घरफोडी करणार्या बर्हाणपूरच्या संशयीताला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (वय-28, रा.शाह बाजार, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुरूवार, 13 एप्रिल रोजी दुपारी ही कारवाई करण्यात अली व आरोपीला पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहर हद्दीत झालेल्या घरफोडीतील संशयीत छत्रपती शिवाजी नगरातील कुवते इस्लामीया मशिदीजवळ असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी संशयित आरोपी मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (28, शाह बाजार, बर्हाणपूर) याला अटक करण्यात आली. संशयीताकडून दोन 750 रुपयांची रोकड, मोबाईल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, सचिन महाजन, किरण चौधरी, भगवान चौधरी, नंदलाल पाटील, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने केली.