मुरूम काढताना सुपरवायझरसह तिघांना मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


Beating up three people including supervisor while removing muroom: Crime against four जळगाव : रस्ता कामासाठी मुरूमाचे उत्खनन सुरू असताना चौघा संशयीतांनी आमची जागा असल्याचे सांगत सुपरवायझरसह तिघांना बेदम मारहाण करीत मजुरांना शिविगाळ करण्यात आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील जुगलखेडा-कडगाव रस्त्यावर जेसीबीच्या मदतीने मुरूम काढण्याचे काम सतीश भगवानराव खांडवेकर (40, करमाळा, जि.औरंगाबाद, ह.मु.जुगलखेडा), मुकेश अरुण कोळी आणि अभिषेक कल्याण अलाट व मजूर गुरुवारी सायंकाळी करीत असताना संशयित नवल कोळी, कोमल कोळी (कडगाव) व त्यांच्यासोबतचे अनोळखी दोघे आले. आमची जागा असल्याने मुरूम का काढतात ? असे म्हणत संशयितांनी शिविगाळ करीत मारहाण सुरू केली. यावेळी मजुरांनादेखील शिविगाळ करण्यात आली तर लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करण्यात आल्याने तिघांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सुपरवायझर सतीश भगवानराव खंडवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नवल कोळी, कोमल कोळी यासह इतर अनोळखी दोघांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नूर खान करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !