जळगावात गोमांस विक्री : आरोपीला एमआयडीसी पोलिसांकडून अटक


Selling beef in Jalgaon : Accused arrested by MIDC police जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गोमांतस विक्री करणार्‍या संशयीताला शहरातील फातेमा नगरातील प्लॉस्टीक कंपनीच्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमधून अटक केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताकडील गोमांस व साहित्य जप्त करण्यात आले. मुख्तार जमाल शेख (32, फातिमानगर, मन्यारखेडा शिवार जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील असलेल्या फातेमा नगरातील प्लास्टिक कंपनीच्याजवळ असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक हेमंत कळस्कर, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, वाहन चालक रवींद्र चौधरी, राहुल रगडे आणि विजय कोळी यांनी गुरूवारी सकाळी 11 वाजता कारवाई करत मुख्तार जमाल शेख (32) यास ताब्यात घेत त्याच्याजवळून गोमांस, हाडे, सुरा आणि कुर्‍हाड जप्त केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल चंद्रकांत रगडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुक्तार जमाल शेख (32) याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !