जळगावात मारहाण करीत मोबाईल लांबवला : दोघांविरोधात गुन्हा


In Jalgaon, mobile phone was stolen by beating : Crime against two जळगाव : रस्त्यावर चालणार्‍या पादचार्‍याला अडवत मारहण करून भामट्यांनी 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. ही घटना महाबळ परीसरातील छत्रपती संभाजी नाट्यगृहाजवळील रस्त्यावर गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजता घडली. या प्रकरणी एका संशयीतासह अल्पवयीनाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील इंद्रनिल सोसायटीत नितीन रमेश सोनवणे हे वास्तव्यास आहेत. ते गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नाट्यगृहाजवळील संभाजी नाट्यगृह परीसरात बाजारात आले असता अनोळखीसह लहान मुलाने त्यांना अडवत मारहाण केली व त्यांच्याकडील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. नितीन सोनवणे यांनी सायंकाळी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !