भरधाव बसने उडवल्याने नाडगावातील पेंटर जखमी
A painter from Nadgaon was injured after being run over by a speeding bus जळगाव : नशिराबाद-जळगाव रस्त्यावरील दूरदर्शन टॉवरजवळ भरधाव बसने उडवल्याने नाडगाव, ता.बोदवड येथील पेंटर व्यावसायीक गंभीर जखमी झाले. फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या अपघातात गुरुवारी बस चालकाविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस चालकाविरोधात गुन्हा
कडूबा रामकृष्ण बाविस्कर (31, नाडगाव, ता.बोदवड) हे व्यवसायाने पेंटर असून 5 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता दुचाकी (एम.एच.12 जी.547) ने जळगावकडून नशिराबाद येथे येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ समोरून येणारी बस क्रमांक (एम.एच.14 बी.टी.98) ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बाविस्कर हे रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवार, 13 एप्रिल रोजी त्यांनी नशिराबाद पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिल्यावरून बस (एम.एच.14 बी.टी.0098) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.
