बसमध्ये चढताना महिलांनो दागिणे सांभाळा : अमळनेरात 10 ग्रॅमच्या पोतसह नऊ हजारांची रोकड लांबवली


A golden texture stretched out while boarding the bus at Amalnerat अमळनेर : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत भामट्याने 10 ग्रॅम वजनाची पोत व तरुणाच्या खिशातील नऊ हजारांची रोकड लांबवल्याची घटना शहरातील बसस्थानकात गुरुवारी दुपारी एक वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
शांताबाई मोतीराम पाटील (70, धार, ता.अमळनेर) या गुरुवारी दुपारी निमतांदळी बसमध्ये चढत असताना अज्ञातांनी त्यांच्याकडील नऊ ग्रॅम वजनाची व एक ग्रॅमचे रामपाण असलेली पोत लांबवली तसेच जितेंद्र यशवंत महाजन (आमळश्वर नगर, माळीवाडा, अमळनेर) यांच्या खिशातील नऊ हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शांताबाई पाटील यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तपास हवालदार प्रमोद पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !