बांधावरील विहिरीत ट्रॅक्टर कोसळले : जामनेर तालुक्यातील चालक असलेल्या शेतकर्याचा मृत्यू
Tractor fell into a well on the dam: death of a farmer who was a driver in Jamner taluka जामनेर : नियंत्रण सुटल्याने कडबाकुट्टी वाहून नेणारे ट्रॅक्टर शेतातील विहिरीत कोसळल्याने चालक असललेया शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना जामनेर तालुक्यातील सामरोद येथे शुक्रवारी दुपारी घडली. सुपडू सुकदेव देसाई (65) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
ट्रॅक्टर खाली आल्याने शेतकर्याचा मृतयू
सुपडू देसाई हे आपल्या शेतातून घराकडे ट्रॅक्टरने कडबा नेत होते. ते स्वत: ट्रॅक्टर चालवित होते. वाटेतच त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत पडले. त्याखाली दबून सुपडू देसाई यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती समजताच सरपंच श्रीकांत पाटील व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली.
क्रेनद्वारे काढले ट्रॅक्टर
क्रेनच्या सहाय्याने आधी ट्रॉली, हुड काढण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकर्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. हर्षल चांदा यांनी दिलेल्या माहितीवरून जामनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


