चोरट्यांनाही उन्हाचा तडाखा असह्य : जळगावात फॅक्टरीच फोडली
The scorching heat is unbearable even for thieves : Factory was broken in Jalgaon जळगाव : चोर्या-घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच चोरट्यांनी आता कुसूंबा येथे कुलर बनवण्याच्या फॅक्टरीलाच टार्गेट करीत 14 हजारांच्या कुलरसह दिड हजार रुपये किंमतीची सिलिंडरची हंडी लांबवली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री केली चोरी
विशाल भागवत ढवळे (29, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाची कुसुंबा शिवारात हॉटेल शिवशाही हॉटेलजवळ कुलर फॅक्टरी आहे. शुक्रवार, 14 एप्रिल रोजी रात्री 12 ते सकाळी सात वाजेच्या सुमारास चोरट्याने कुलरच्या फॅक्टरचे शटरचे लॉक तोडून 14 हजार रुपये किंमतीचे चार कुलर तसेच गॅस हंडी असा 15 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात तरुणाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.
