उघड्या दरवाज्याने केला घात : जळगावात महिलेच्या घरातून साडेआठ हजारांचा ऐवज लांबवला
Gold texture and mobile phone stolen from woman’s house in Jalgaon जळगाव : घराचा दरवाजा उघडा राहिल्याची संधी चोरट्यांनी साधत सोन्याची पोत व मोबाईल असा साडेआठ हजारांची ऐवज लांबवला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरवाजा उघडा राहिल्याने चोरट्यांना संधी
आशा सुनील सावकारे (35, पवन नगर, जळगाव) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 14 एप्रिल रोजी रात्री 1 ते 3 वाजेच्या दरम्यान त्यांचा घराचा दरवाजा उघडा राहिल्यानंतर महिला झोपून गेल्या. मध्यरात्री चोरट्याने घरात घुसून महिलेची सोन्याची पोत आणि मोबाईल असा एकूण साडेआठ हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक बापू कोळी करीत आहेत.
