चोर के दाढी मे तिनका ही आज भाजपाची परीस्थिती : नागपूरात नाना पटोलेंची भाजपावर चौफेर टिका
Chor ke darhi me tinka is the state of BJP today: In Nagpur, various parties criticize BJP नागपूर : अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले. अधिवेशनात सरकारने मदत करावी यासाठी आम्ही सातत्याने मागणी केली. राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे. पण शेतकर्यांना एक पैसाची मदत करण्यात आली नाही शिवाय तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतेय, राज्याच्या सरकारला देणेघेणे नाही. जाहिरातीवर एक हजार कोटी निधी प्रस्तावित केला असून मुख्यमंत्र्यांचा राज्यात कॉमेडी शो सुरू असल्याची घणाघाती टिका वज्रमुठ सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
राज्यात भाजपा नव्हे ईडीचे सरकार
पटोले यांनी आक्रमक शैलीत सांगितले की, राज्यात ईडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. भाजपाचा पर्दाफाश संभाजीनगर सभेने केला. नागपूरच्या सभेचा वादही कोर्टात गेला. भाजपा का घाबरते? चोर के दाढी मे तिनका, ही परिस्थिती आज भाजपाची झालीय. देशातील सर्वात महागडे शहर नागपूर आहे. कर्जाने आणलेला देखावा दिसतो. या शहरात जे आणले ते कर्जरुपाने आणले. लोकांचे खिसे कापले जातात. नागपूरकारांना लुटले जातेय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर हल्लाबोल केला.




व्यासपीठावरूनच टोचले सत्ताधार्यांचे कान
अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यात धर्माधिकारी यांनी मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म आहे अशा शब्दात व्यासपीठावरूनच सत्ताधार्यांचे कान टोचले, असेही पटोले म्हणाले. राज्यातील जनतेचा पैसा तुटलेल्या एसटीवर लावून कोट्यवधी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहे. 9 कंपन्यांना शासकीय व्यवस्थेत काम दिले गेले. जनतेच्या कामाचा पैसा कर रुपाने घेतला जातो. पण त्याचा वापर प्रशासकीय वापरातून लोकांसाठी करणे गरजेचा आहे. पण आऊटसोर्सिंग करून तरुणांची फसवणूक केली जात आहे. कंत्राटदारांची व्यवस्था निर्माण केलीय असा आरोप नाना पटोले यांनी म्हटलं.