यावल तालुक्यातील 63 पैकी 32 ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’


यावल (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीपैकी 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात काढण्यात आली. आरक्षणात 50 टक्के जागेवर महिलांचे आरक्षण जाहिर करण्यात आले.

63 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर
यावल तालुक्यात 67 ग्रामपंचायती असून चार ग्रामपंचायती या पेसा क्षेत्र म्हणून घोषीत आहेत. तेथील जागा अनुसुचित जमातीकरीता आरक्षीत आहे. उर्वरीत 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. मंगळवारी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांचे आरक्षण निघाले. पूर्वीच्या आरक्षणात बदल केला गेला नाही मात्र ज्या इतर मागसवर्गीय आरक्षणातून सर्वसाधारण झालेल्या 15 व एक इतर मागासवर्गीय अशा 16 जागेपैकी 8 जागेवरील महिलांचे आरक्षण जाहिर करण्यात आले. प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, सुयोग पाटील यांची उपस्थिती होती.

असे निघाले आरक्षण
अनुसुचित जमाती राखीव- बोराळे, वड्री खुर्द, कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, पाडळसे, साकळी, हंबर्डी, पिळोदे बुद्रुक, राजोरे

अनुसुचित जामाती महिला राखीव- कोरपावली, म्हैसवाडी, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द, चिखली बुद्रुक, चितोडे

अनुसूचित जाती राखीव- निमगाव, किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभूर्णी

अनुसुचित जाती महिला राखीव- वनोली, दुसखेडे, न्हावी, अंजाळे

नामाप्र- भालशीव, नामाप्र महिला राखीव- दहिगाव

सर्वसाधारण- महेलखेडी, हिंगोणे, आमोदे, नायगाव, सातोद, कासारखेडा, किनगाव खुर्द, विरावली, चिखली खुर्द, चिंचोली, शिरागड, सावखेडेसीसम, थोरगव्हाण, पिंपरूड, टाकरखेडे, बोरावल बुद्रुक,

सर्वसाधारण महिला राखीव- अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, बोरखेडा बुद्रुक, डोणगाव, नावरे, कोळन्हावी, वढोदे प्र.यावल, आडगाव, भालोद, चुंचाळे, गिरडगाव, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र.सावदा, कोळवद.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !