पारोळा तालुक्यात तिघांच्या अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती : संशयीतांना अटक
In Parola taluka, a minor girl became pregnant due to the torture of three people : Suspects arrested पारोळा : जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यातील रहिवासी असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तीन नराधम तरुणांनी शेतात वारंवार अत्याचार केल्याने त्यातून तरुणी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पारोळा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घटनेप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींनी तरुणीचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी बारकू उर्फ प्रवीण बाळू पाटील (23), पप्पू उर्फ शुभम बापू पाटील (23, दोघे रा.सावखेडा तुर्क, ता.पारोळा) आणि भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (25, रा.सावखेडा होळ, ता.पारोळा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अत्याचार
16 वर्षीय पिडितेच्या तक्रारीनुसार, पारोळा तालुक्यातील ज्या शेत शिवारात ती कामाला जात अतस तेथे-तेथे संशयित शेतात कामाला येत जवळीक वाढून कधी एकाने तर दोघांनी अत्याचार केला शिवाय हा प्रकार सांगितल्यास तुझा आम्ही व्हिडिओ बनवला असून तो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा वारंवार अत्याचार करायचे. या प्रकारानंतर फिर्यादीच्या पोटात दुखू लागल्याने तिने ही बाब आईला सांगितल्यानंतर 11 एप्रिल रोजी खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता पीडीता ही 16 आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबियांना धक्काच बसला
पारोळा पोलिसात गुन्हा : संशयीतांना अटक
या प्रकरणी पीडीतेने पारोळा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून संशयित बारकू उर्फ प्रवीण पाटील (23), पप्पू उर्फ शुभम बापू पाटील (23) व भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (25) यांच्याविरोधात पारोळा पोलिसांनी पोस्को, अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तिघां संशयित आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.


