शेंदुर्णीतील अल्पवयीन मुलीला पळवले : एकाविरोधात गुन्हा


शेंदुर्णी : गावातील एका भागातील अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी संशयित दीपक पिंटू शिंपी (कुमावत गल्ली, शेंदुर्णी, ता.जाामनेर) विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडीतेच्या मामांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या 16 वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन भाचीला संशयित दीपक शिंपी याने काहीतरी फूस लावून आमिष दाखवत पळवून नेले. हा प्रकार शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. तपास एएसआय शशिकांत पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !