भोलाणेत जुन्या वादातून दोघांना मारहाण : त्रिकूटाविरोधात गुन्हा


In Bholane, two people were beaten up due to an old dispute : a crime against the trio जळगाव : जुना वाद उफाळून आल्यानंतर भोलाणेतील दोघांना तिघांनी शिविगाळ करीत मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
रणजीत जगदीश कोळी (18, भोलाणे) या तरुणाच्या तक्रारीनुसार रविवारी सायंकाळी सात वाजता जुन्या वादातून संशयित गोट्या उर्फ समाधान डिगंबर कोळी, शरद भागवत कोळी आणि चावदस भिका कोळी (तिघे रा.भोलाणेए ता.जळगाव) यांनी शिविगाळ करीत मारहाण केली. गोट्याने रणजीत यांच्या डोक्यावर लाकडी काठीने मारहाण केली तसेच समाधानच्या उजव्या हातावर मारहाण करण्यात आली. आमच्या नादाला लागल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही संशयितांनी दिली. रणजीत कोळी याने पोलिसात धाव घेत रात्री तक्रार दिल्यानंतर संशयित गोट्या उर्फ समाधान दिगंबर कोळी, शरद भागवत कोळी आणि चावदस भिका कोळी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विलास लक्ष्मण शिंदे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !