जळगावात कारच्या काचा फोडत 12 हजारांची रोकड लांबवली
12 thousand in cash was stolen by breaking the windows of the car in Jalgaon जळगाव : शिरपूर तालुक्यातील व्यापार्याच्या चारचाकी वाहनातून चोरट्यांनी 12 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना शहरातील चित्रा चौकात सोमवारी दुपारी 12.40 वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जेवणासाठी व्यापारी जाताच चोरट्यांनी साधली संधी
शिरपूर येथील फर्टीलायझर विक्रीचा व्यवसाय असलेले जितेंद्र शालिग्राम भदाणे हे एका मित्रासह जळगावमार्गे चारचाकी (एम.एच.18 बी.सी.0257) ने जामनेर जात असताना सोमवारी दुपारी 12.40 वाजेच्या सुमारास चित्रा चौकात असलेल्या एका फर्टीलायझर दुकानाबाहेर त्यांनी कार पार्क केली व जेवणासाठी गेले मात्र याचवेळी चोरट्यांनी संधी साधत मागील दरवाज्याची काच फोडून एक हजार रुपये किंमतीची बॅग लांबवली. या बॅगेत 11 हजारांची रोकड तसेच पॅनकार्ड व चेकबुकचा समावेश होता. भदाणे यांनी तत्काळ शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना माहिती दिल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.


