तीन महिन्यांपूर्वीच झाला विवाह ; हातावरील मेहंदी सुकण्यापूर्वीच किनगावच्या तरुणाच्या जळगावात शॉक लागून मृत्यू


A laborer died due to electric shock in a plastic company in Jalgaon जळगाव : शहरातील कॉलनीजवळील प्लॅस्टीक कंपनीत काम करताना विजेचा धक्का लागल्याने मजुराचा मृत्यू ओढवला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रकाश मजन बारेला (22, किनगाव, ता.यावल, ह.मु. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
प्रकाश बारेला हा पत्नी व लहान भाऊ अनिल बारेला सोबत सुप्रिम कॉलनीत गेल्या महिन्याभरापासून वास्तव्याला होता. सुप्रिम कॉलनी जवळील प्लॉस्टिक रीसायकलींग करण्याच्या कंपनीत दोन्ही भाऊ कामाला होते. बुधवार, 19 एप्रिल रोजी प्रकाश बारेला हा कामावर असतांना दुपारी तीन वाजता रीसायकलींग करणारे मशीन सुरू करण्यासाठी गेल्यानंतर विजेचा जोरदार धक्का बसल्याने यात प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. इतर सहकार्‍यांनी तातडीने उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे बारेला कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयताच्या पश्चात वडील, पत्नी काजल, दोन भाऊ अनिल आणि बाळू असा परीवार आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ल तपास पोलीस नाईक किरण पाटील आणि ढवळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !