जळगावात दुचाकी चोरटे सक्रिय : बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपाजवळून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


जळगाव : शहरातील बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका झाडासमोरून नोकरदाराची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी सात वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावात टोळी कार्यरत
स्वप्निल शालिग्राम पाटील (34, छत्रपती संभाजीनगर, जळगाव) हा तरुण खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. सोमवार, 10 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील असलेल्या पेट्रोल पंपाच्यामागे दुचाकी (एम.एच.19 बी.एक्स.0158) ने आल्यानंतर झाडाखाली दुचाकी पार्क करण्यात आली. अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. मंगळवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !